NEW & HOT JOB

भारतीय तटरक्षक दलात ४० पदासाठी भरती
भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम मुख्यालयात चार्जमेन (३ जागा), शिट फिटर (२ जागा), वेल्डर (२ जागा), कारपेंटर (२ जागा), स्टोअरकिपर (२ जागा), वाहन चालक (८ जागा), लष्कर (५ जागा), स्प्रे पेंटर (१ जागा), दप्तरी (१ जागा), शिपाई (३ जागा), चौकीदार (४ जागा), सफाईवाला (२ जागा), माळी (३ जागा), वाहन स्वच्छक (१ जागा), पॅकर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी -३ फेब्रुवारी २०१२च्या अंकात आली आहे.

भारतीय सैन्य दलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकारी पदाच्या ८६ जागा
भारतीय सैन्य दलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकारी पदासाठी (८६ जागा) भरण्यात येणार आहेत. यामध्ये अभियांत्रिकी केलेल्या पुरुष व महिलांसाठी जागा असून ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी -३ फेब्रुवारी २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एमपीएससीमार्फत सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या २१ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या कृषी प्रशासकीय सेवेतील सहायक प्रशासन अधिकारी (२१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय लष्कराच्या संरक्षण संशोधन व विकास विभागात शास्त्रज्ञाच्या २९ जागा
भारतीय लष्कराच्या संरक्षण संशोधन व विकास विभागात शास्त्रज्ञ (२९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी -३ फेब्रुवारी २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://rac.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कामगार राज्य विमा महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयात २९५ जागा
कामगार राज्य विमा महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयात वरिष्ठ श्रेणी लिपिक (१४७ जागा), बहुकार्यिक कर्मचारी (१४८ जागी) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधी अधिक माहिती http://www.esicmaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २१ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सोलापूर विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या २१ जागा
सोलापूर विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचारी भरती अंतर्गत कक्ष अधिकारी (१ जागा), सांख्यिकी सहायक (१ जागा), भांडारपाल (१ जागा), लघुटंकलेखक (३ जागा), प्रयोगशाळा सहायक (२ जागा), कनिष्ठ लिपिक (७ जागा), प्रयोगशाळा परिचर (१ जागा), ग्रंथालय परिचर (१ जागा), शिपाई (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एमपीएससीमार्फत कनिष्ठ भूवैज्ञानिकाच्या १६ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कनिष्ठ भूवैज्ञानिक (१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एमपीएससीमार्फत पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या २२४ व रेशीम उपसंचालकांची १ जागेसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील पशुधन विकास अधिकारी (२२४ जागा) तसेच रेशीम उपसंचालक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एमपीएससीमार्फत वैद्यकीय व आरोग्य सेवेतील ८७ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय व आरोग्य सेवेतील मनोविकृती चिकित्सक (९ जागा), जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग/वैद्यकीय अधिकारी व इतर तत्सम (५८ जागा), जिल्हा आरोग्य अधिकारी (१४ जागा), सहसंचालक (५ जागा), संचालक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबईतील सशस्त्र सेना चिकित्सा सामान डेपोत ११ जागा
केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र सेना चिकित्सा सामान डेपो, मुंबई येथे स्टोअरकीपर (१ जागा), शिपाई (१ जागा), कामगार (९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १३ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. याविषयीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियाच्या बुऱ्हानपुर प्लँटमध्ये १४ जागा
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियाच्या बुऱ्हानपुर प्लँटमध्ये एक्स रे तत्रंज्ञ –प्रशिक्षणार्थी (१ जागा), प्रशिक्षणार्थी औषध निर्माता (२ जागा), प्रशिक्षणार्थी ऑप्टोमेट्रेशियन (१ जागा), प्रशिक्षणार्थी ऑडिओमेट्रिशियन (१ जागा), फिजिओथेरपिस्ट (१ जागा), इसीजी टेक्निशियन (१ जागा), स्टाफ नर्स –महिला प्रशिक्षणार्थी (४ जागा), स्टाफ नर्स –पुरुष प्रशिक्षणार्थी (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० जानेवारी २०१२च्या अंकात आली आहे.

एमपीएससीमार्फत ६ जागांसाठी सरळसेवेद्वारे भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या कारागृह महानिरीक्षक यांच्या कार्यालयात संशोधन अधिकारी (१ जागा), अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक (१ जागा), विधी व न्याय विभागातील सहायक प्रारुपकार नि अवर सचिव (३ जागा), सॉलिसिटर-नि-उपसचिव (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्र शासनाच्या अखत्यारितील अलीयावर जंग राष्ट्रीय संस्थानमध्ये ७ जागा
केंद्र शासनाच्या अखत्यारितील अलीयावर जंग राष्ट्रीय संस्थानाच्या कार्यालयांत रीडर-स्पीच पॅथोलॉजी (१ जागा), व्याख्याता-एसपी अँड एचजी (१ जागा), व्याख्याता-शिक्षण (३ जागा), व्याख्याता –मानसशास्त्र (१ जागा), व्यावसायिक समुपदेशक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १७ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पुण्यातील लष्करी वैद्यकीय भांडार डेपोमध्ये ६ जागा
पुण्यातील लष्करी वैद्यकीय भांडार डेपोमध्ये कनिष्ठस्तर लिपिक (१ जागा), भांडारपाल (२ जागा), एक्स रे इलेक्ट्रिशियन (१ जागा), शिपाई (१ जागा), चौकीदार (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७-१३ जानेवारी २०१२च्या अंकात आली आहे.

पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात १५ जागा
केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे कनिष्ठस्तर लिपिक (२ जागा), बूट मेकर (१ जागा), संदेशक (५ जागा), वॉशर मॅन (२ जागा), न्हावी (१ जागा), सफाईवाला (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० जानेवारी २०१२च्या अंकात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत १६४ जागा
नवी मुंबई महानगरपालिकेत सहायक कर निर्धारक व संकलक (१ जागा), प्रशासकीय अधिकारी (१ जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (१ जागा), स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (५४ जागा), उप लेखापाल (४ जागा), क्ष किरण तंत्रज्ञ (३ जागा), सी.एस.एस.डी. (१ जागा), रक्तपेढी तंत्रज्ञ (१ जागा), डायलिसिस तंत्रज्ञ (४ जागा), मिश्रक औषध निर्माता (३ जागा), वरिष्ठ लिपिक/कर निरीक्षक (४ जागा), ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (१२ जागा), अळी निरीक्षक (१ जागा), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (१ जागा), अनुरेखक (१ जागा), समयलेखक (१ जागा), दूरध्वनी चालक (१ जागा), वाहन चालक –अग्निशमन (२ जागा), वाहनचालक (२० जागा), प्लंबर/फिटर (४ जागा), उद्यान सहाय्यक (५ जागा), व्रणोपचारक (१ जागा), नोटीस बजावणीस (१ जागा), वॉचमन (१ जागा), शिपाई (१५ जागा), आया (४ जागा), वॉर्डबॉय (८ जागा), माळी/बहुउद्देशीय सेवक (९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१२ आहे. अर्ज MKCL च्या अधिकृत केंद्रावर भरता येईल. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १४ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http:/oasis.mkcl.org/nmmc या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सर्व्हे ऑफ इंडियामध्ये १६ जागा
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील सर्व्हे ऑफ इंडियामध्ये टोपो ट्रेनी (१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://www.surveyofindia.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १३ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (१ जागा), उपप्रबंधक (१ जागा) तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (९ जागा), भाषा उपसंचालक-अनुवाद व शब्दावली (१ जागा), अनुवादक-हिंदी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. १० जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात माजी सैनिकांसाठी २१० जागा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात माजी सैनिकांमधून कॉन्स्टेबल-ट्रेडस्मन (२१० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती http://www.cisf.gov.in किंवा http://www.cisfrecruitment.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. २ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

Advertisements

3 thoughts on “NEW & HOT JOB

  1. Dattatray Dashrath Nadekar

    Thank you

  2. your best service i like in
    i am very very fain thainks

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s