अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात १०२ जागा

  • अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात १०२ जागा

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपीक – टंकलेखक (७० जागा), वाहन चालक (२ जागा), वॉचमन व स्वच्छक (३० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.amravati.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

  • रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात ३१ जागा

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (२५ जागा), शिपाई (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharashtra.gov.in/mbusiness/MGITD/Pages/CareersAndOpportunities.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे १६ जागांसाठी परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे गृह विभागातील पोलीस उपअधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त, बिनतारी संदेश (७ जागा), उद्योग विभागातील शासकीय मुद्रण, लेखन सामग्री संचालनालयातील सहायक व्यवस्थापक (४ जागा), नियोजन विभागातील अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील सहसंचालक (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २४ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.inhttp://www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • रा. आ. पोद्दार वैद्यक महाविद्यालयात (आयुर्वेद) सेवक २ जागा

मुंबईतील रा. आ. पोद्दार वैद्यक महाविद्यालयात (आयुर्वेद) सेवक (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१२ आहे. या संबंधीची माहिती http://maharashtra.gov.in/mbusiness/MGITD/Pages/CareersAndOpportunities.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ जागा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी (२ जागा), योगा व निसर्गोपचार तज्ज्ञ (१ जागा), समन्वयक (३ जागा), मसाजिस्ट कम अटेंडंट (१ जागा), वैद्यकीय अधिकारी-पूर्ण वेळ (८ जागा) ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. २८ फेब्रुवारी २०१२ रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २२ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

  • कर्मचारी निवड मंडळातर्फे केंद्रीय पोलीस दलात २१९५ जागांसाठी भरती

कर्मचारी निवड मंडळातर्फे (स्टाफ सिलेक्शन कमिशन) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उपनिरीक्षक (१८५७ जागा) व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सहायक उप निरीक्षक (३३८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८-२४ फेब्रुवारी २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s