JOB

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारीच्या २९ जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (२९ जागा) हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. ३ मे २०१२ रोजी होणार आहेत. या संबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १७ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

रायगड जिल्हा परिषदेत ८२ जागा
रायगड जिल्हा परिषदेत जिल्हा निवड समितीमार्फत कनिष्ठ अभियंता (६ जागा), कृषि अधिकारी (२ जागा), कृषि विस्तार अधिकारी (१ जागा), पर्यवेक्षिका –एकात्मिक बाल विकास सेवा योजना (२ जागा), शिक्षण विस्तार अधिकारी (१ जागा), औषध निर्माता (१ जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (१ जागा), आरोग्य सेवक-पुरुष (६ जागा), आरोग्य सेवक-महिला (१० जागा), कंत्राटी ग्रामसेवक (३९ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (४ जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (१ जागा), कनिष्ठ सहाय्यक-लेखा (३ जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (१ जागा), शिपाई/परिचर (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. १६ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती LINK या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

क्रीडा व युवक सेवा मुंबई विभागातर्फे ७ जागा
क्रीडा व युवक सेवा मुंबई विभागाच्या उपसंचालक कार्यालयात नौका प्रतिमान निदेशक (१ जागा), वाहन चालक (१ जागा), चौकीदार (२ जागा), शिपाई (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रात ४ जागा
मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रात प्रदर्शन सहायक (१ जागा), कनिष्ठ स्टेनोग्राफर (१ जागा), कनिष्ठस्तर लिपिक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. १४ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.nehrusciencecentre.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागात सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारीच्या ८१ जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य गुप्तवार्ता विभागात सरळसेवेने सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी (८१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ५ मे २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://www.mahapolice.gov.in किंवा www.exxononline.net/sid या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. १२ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

खादी व ग्रामोद्योग महामंडळ प्रशासकीय महासंचालनालयात २६ जागा
खादी व ग्रामोद्योग महामंडळ प्रशासकीय महासंचालनालयात सहायक संचालक-सामान्य प्रशासन (८ जागा), सहायक संचालक-खादी (२ जागा), सहायक संचालक-ग्रामोद्योग (७ जागा), लेखा अधिकारी (९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावेत. यासबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४-३० मार्च २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.kvic.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेद्वारे ७०२ जागांसाठी भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१२ ची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण ७०२ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ एप्रिल २०१२ आहे. यासबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४-३० मार्च २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आयुर्वेद संचालनालयात २० जागा
महाराष्ट्र शासनाच्या आयुर्वेद संचालनालयात अपंग, मागासवर्गीय भरती अंतर्गत आयुर्वेद विस्तार अधिकारी (२ जागा), पंचकर्म वैद्य- स्त्री (२ जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (२ जागा), अधिपरिचारिका (४ जागा), संग्रहपाल (१ जागा), सहाय्यक औषधी निर्माता-आयुर्वेद (१ जागा), वरिष्ठ लिपिक (३ जागा), लिपिक टंकलेखक (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०१२ आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डात ५४ जागा
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डात सहाय्यक बंदर निरीक्षक (८ जागा), इंजिन चालक (१० जागा), खलाशी (३६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०१२ आहे. अधिक माहिती www.mahammb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. ४ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात ३२ जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात जवान (३२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कामगार राज्य विमा महामंडळात १६ जागा
कामगार राज्य विमा महामंडळात खेळाडू कोट्यातून वरिष्ठ श्रेणी लिपिक (८ जागा), बहुकार्मिक कर्मचारी (८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०१२ आहे. अधिक माहिती http://www.esicmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमत व महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३० मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयात अपंग प्रवर्गासाठी २ जागा
महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयात अपंग प्रवर्गातून लिपिक टंकलेखक (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३० मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अहमदनगर येथील आर्म्ड स्टॅटिक वर्कशॉप, ईएमईमध्ये २० जागा
संरक्षण दलाच्या अहमदनगर येथील आर्म्ड स्टॅटिक वर्कशॉप, ईएमईमध्ये कामगार (२ जागा), चौकीदार (५ जागा), न्हावी (१ जागा), वॉशरमन (३ जागा), बुटमेकर (१ जागा), टेलर (१ जागा), व्हीएम/एएफव्ही (४ जागा), टेलिकॉम मेकॅनिक (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३७ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १०-१६ मार्च २०१२ या कालावधीत प्रसिद्ध झाली आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s