जागा

 • मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ग्रॅज्युएट/टेक्निशियन आणि ट्रेड ॲप्रेंटिसच्या ६३ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ग्रॅज्युएट/टेक्निशियन आणि ट्रेड ॲप्रेंटिस (६३ जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकतमध्ये दि. ७ जून २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारीच्या ५८ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (५८ जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखत दि.१८ ते १९ जून २०१२ या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ७ जून २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीत ५ जागा

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीत सह संचालक-ब्लड सेफ्टी अँड क्वॉलिटी ॲशुरन्स (१ जागा), सहसंचालक-टीआय (१ जागा), पीपीटीसीटी एम आणि ई अधिकारी (१ जागा), पीपीटीसीटी सल्लागार (१ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १६ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • हिंदुस्थान इन्सैक्टिसाईड्स लिमिटेडमध्ये ९ जागा

हिंदुस्थान इन्सैक्टिसाईड्स लिमिटेडमध्ये उप वित्तीय व्यवस्थापक (१ जागा), सुरक्षा अधिकारी (१ जागा), सुरक्षा पर्यवेक्षक (१ जागा), ॲनालिस्ट (३ जागा), वरिष्ठ ड्राफ्टस्‌मन (१ जागा), बॉयलर ऑपरेटर (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.hil.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये १२९ जागा

ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये ए२ व ए१ पदांच्या एकूण ९८ जागा व फिल्ड ऑपरेटरच्या ३१ जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • रायगड जिल्हा परिषदेत विशेष समावेशित शिक्षण तज्ज्ञाच्या १२ जागा

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात समावेशित शिक्षणासाठी विशेष समावेशित शिक्षण तज्ज्ञ (१२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०१२ पर्यंत आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात वैज्ञानिक अधिकारी पदाच्या २५ जागा

महाराष्ट्र शासनाच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात वैज्ञानिक अधिकारी (२५ जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. ११ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३० मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • सोलापूर महानगरपालिकेत अंध व अपंग प्रवर्गातील ५० जागा

सोलापूर महानगरपालिकेत अंध व अपंग विशेष भरती मोहिमेअंतर्गत वैद्यकीय अधिकारी (१ जागा), अवेक्षक-स्थापत्य (१ जागा), भूमापक (१ जागा), मिश्रक (१ जागा), आरोग्य निरीक्षक (१ जागा), अनुरेखक (१ जागा), कनिष्ठ श्रेणी लिपिक (१३ जागा), मिडवाईफ (३ जागा), मेस्त्री (१ जागा), वडार (१ जागा), मुकादम (२ जागा), लॅम्प लायटर (१ जागा), चावीवाला (१ जागा), महिला अटेंडंट (१ जागा), रखवालदार (१ जागा), शिपाई (७ जागा), मजदूर (१३ जागा), आया (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. २९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात १८६ जागा

महाराष्ट्र शासनाच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहाय्यक (२३ जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (२३ जागा), कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (१३ जागा), वरिष्ठ लिपिक-भांडार (३ जागा), लिपिक टंकलेखक (३२ जागा), दूरध्वनी चालक (१ जागा), वाहनचालक (४ जागा), प्रयोगशाळा परिचर (५४ जागा), भांडार नोकर (१ जागा), चपराशी (८ जागा), पहारेकरी (१० जागा), माळी (२ जागा), सफाईगार (१२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २३ जून २०१२ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर सविस्तर माहिती www.exxononline.net/fslhttp://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

 • जळगाव येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरी ७ जागा

जळगाव येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीत स्टोअर किपर (६ जागा), फायरमन (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १९-२५ मे २०१२च्या अंकात आली आहे.

 • अंबरनाथ येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये १४५ जागा

अंबरनाथ येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये इलेक्ट्रिशियन (४ जागा), फिटर इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (५ जागा), फिटर जनरल (३३ जागा), मशिनिस्ट (५८ जागा), मिलराईट (१० जागा), मोल्डर/फौन्ड्रीमन (२५ जागा), टर्नर (१० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर कोर्सच्या अंतर्गत ७५ जागा

भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर कोर्सच्या अंतर्गत अभियंत्यासाठी अधिकाऱ्यांच्या ५९ जागा तसेच शैक्षणिक विभागात १६ जागा भरण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ मे २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • रेल्वे भरती मंडळातर्फे भारतीय रेल्वेमधील ६८२९ जागांसाठी भरती

रेल्वे भरती मंडळातर्फे भारतीय रेल्वेमधील कमर्शियल ॲप्रेंटिस (३१७ जागा), ट्रॅफिक ॲप्रेंटिस (७४० जागा), ईसीआरसी (११४ जागा), गुड्स गार्ड (१७६८ जागा), कनिष्ठ लेखा सहायक नि टंकलेखक (७९१ जागा), वरिष्ठ लिपिक नि टंकलेखक (४४१ जागा), सहायक स्टेशन मास्तर (२६४६ जागा), ट्रॅफिक असिस्टंट (१२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ११ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ मे २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • भाभा अणू संशोधन केंद्रात 37 जागा

भाभा अणू संशोधन केंद्रात टेक्निशियन (36 जागा), वाहनचालक नि ऑपरेटर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2012 आहे. अधिक माहिती http://www.barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 13 मे 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

Advertisements

3 thoughts on “जागा

 1. plez jobs deteks on my email

 2. plez jobs detels on my email

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s