‘महान्यूज’-संधी रोजगाराची

  • ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या 24 जागा

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी संवर्ग (24 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2012 आहे. अर्ज व इतर माहिती  www.thane.nic.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


  • ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये 425 जागा

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये परिविक्षाधिन अधिकारी (325 जागा), कृषि अधिकारी (100 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14-20 जुलै 2012 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.  अधिक माहिती www.obcindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • भूमी अभिलेख विभागाच्या कोंकण प्रदेश कार्यालयात २०८ जागा 

महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, कोकण विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (१८२ जागा), शिपाई (२७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्सच्या ६ जुलै २०१२च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विशेष समाज कल्याण अधिकारी पदाच्या १५ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी (१५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१२ आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील उपसंचालक, महाराष्ट्र भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०१२ आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • मुंबई रेल्वे भरती मंडळामार्फत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेमधील तंत्रज्ञाच्या ७६८ जागांसाठी भरती

मुंबई रेल्वे भरती मंडळामार्फत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेमध्ये विविध शाखांतील तंत्रज्ञ (७६८ जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१२ आहे. यासंबमंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

One thought on “‘महान्यूज’-संधी रोजगाराची

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s