जागा 2012

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 9 जागा

पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत मुख्य प्रकल्प संचालक (1 जागा), सहाय्यक प्रकल्प संचालक (2 जागा), प्रकल्प अधिकारी (2 जागा), प्रकल्प संचालक – विशेष प्रकल्प (1 जागा), स्थावर व्यवस्थापक (1 जागा), स्वीय सहायक (1 जागा), अभिलेखापाल (1 जागा) ही पदे करार तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 12 ऑक्टोबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 8 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती   http://trtimah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

 • अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 35 जागा

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (20 जागा), शिपाई (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज Maharashtra
Knowledge Corporation ltd. (M.K.C.L.) मार्फत मागिण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2012 आहे. अधिक माहिती www.ahmednagar.nic.in http://maharojgar.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

 • अलिबाग-रायगडमध्ये युवकांसाठी सैन्य भरती


सैन्य भरती कार्यालय, मुंबई यांच्यामार्फत दि.6 ते 13 ऑक्टोबर 2012 पर्यंत सकाळी 5.00 वाजल्यापासून आर.सी.एफ. मैदान, कुरुळ, वेश्वी, अलिबाग-रायगड येथे सैन्यभरती होणार आहे. यामध्ये सोल्जर जनरल डयुटी, सोल्जर टेक्नीकल सोल्जर, नर्सिग असीस्टंट सोल्जर ,क्लर्क/ एसकेटी, रिलीजियस टिचर (JCOs) ही पदे भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची अधिक माहितीसाठी मुंबई भरती कार्यालय दूरध्वनी क्र. 022-22157312/22153510 आणि 020-26341698 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

 • एमपीएससीतर्फे महाराष्ट्र भूजल सेवेतील उपअभियंत्यांच्या 16 जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र भूजल सेवा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गट-अ मधील उप अभियंता – यांत्रिकी (16 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2012 आहे. अधिक माहिती www.mpsconline.gov.in www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

 • कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात 3 जागा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वरिष्ठ लेखा लिपिक नि रोखपाल (1 जागा), सहाय्यक नि डेटा एन्ट्री ऑपरेटर (1 जागा), एम.आय.एस. समन्वयक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापकांच्या 11 जागा

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध विषयांच्या प्राध्यापक (5 जागा), सहयोगी प्राध्यापक (6 जागा) ही पदे करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2012 आहे. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 16 व 17 ऑक्टोबर 2012 रोजी होणार आहेत. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • नंदूरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात अभियंत्याच्या 12 जागा

नंदूरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात अभियंता (12 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 26 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • नागपूर, वर्धा, भंडारा, व गोंदिया वन विभागात वनरक्षकाच्या 150 जागा

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया या वनविभागात वन रक्षक (150 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोंबर 2012 अशी आहे. आवेदनपत्र भरण्याकरिता नमुना,अर्ज अटी व शर्तीबाबत अधिक माहिती www.ccftngp.govbharati.comwww.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • जळगाव येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत मजुरांच्या 46 जागा

जळगाव येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत मेकॅनिस्ट (17 जागा), शिट मेटल वर्कर (1 जागा), वेल्डर (2 जागा), फिटर – जनरल/पाईप (3 जागा), इलेक्ट्रिशियन/वायरमन (1 जागा), फिटर इलेक्ट्रॉनिक (2 जागा), टर्नर (1 जागा), मिलराईट सेमी (2 जागा), एक्झामिनर (14 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 28 दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 सप्टेंबर 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ofbh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • मुंबईतील कारागृह महानिरीक्षणालयात 131 जागा

मुंबईतील कारागृह महानिरीक्षणालय, दक्षिण विभागात कारागृह रक्षक (116 जागा), लिपिक (11 जागा), वरिष्ठ लिपिक (1 जागा), कनिष्ठ लिपिक (2 जागा), मिश्रक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 24 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात 64 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (1 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (3 जागा), दस्तावेज व संशोधन सहाय्क (1 जागा), स्पीच थेरपिस्ट (1 जागा), फिजिओथेरपिस्ट (1 जागा), ऑक्युपेशनल थेरपिस्ट (1 जागा), क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट (1 जागा), एम.आय.एस. कोऑर्डिनेटर (11 जागा), फिरते विशेष शिक्षक (25 जागा), समावेशित शिक्षण विशेष तज्ज्ञ (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 27 सप्टेंबर 2012 ते 11 ऑक्टोबर 2012 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामना व सकाळमध्ये दि. 15 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s